इन्फेक्शन म्हणजे बॅक्टरीयाचा संसर्ग. मूत्रमार्ग ह्या शब्दात किडनीज(मूत्रपिंडे), युरेटर (मूत्रवाहक नलिका), युरिनरी ब्लॅडर (मूत्राशय) आणि युरेथ्रा (मूत्र उत्सर्जक नलिका) असे बरेच अवयव येतात. ह्यापैकी किडनीमध्ये युरिन तयार होते आणि ती मूत्राशयात साठवली जाते. मूत्राशय भरले की आपल्याला ती बाहेर टाकण्याचे वेग येतात. त्यावेळी जर योग्य परिस्थिती नसेल तर आपण ते टाळतो. मात्र एक मर्यादेनंतर आपण ती थोपवू शकत नाही. मग मात्र कंट्रोल जाऊ शकतो.
स्त्रियांना मूत्रमार्गाचे इन्फेक्शन वारंवार का होते ?
- लघवी करताना दुखणे, जळजळणे
- जास्त वेळ लघवीला जावे लागणे
- पोटात, ओटीपोटात दुखणे
- पांढरट, दुर्गंध येणारी लघवी होणे
- शरीर संबंधाच्या वेळी दुखणे
- ताप येणे, थकवा
- उलटी येणे
माझ्या लॅब मधली टेक्निशियन लग्नानंतर हनिमूनला जाऊन आली होती. काही दिवसांतच पोटात खूप दुखणं , लघवीला जळजळ ही लक्षणे दिसू लागली. प्रथमच शरीर संबंध झाले की योनीमार्गातील जंतू सहज मूत्रमार्गात जातात आणि मूत्राशयापर्यंत पोचतात. ह्याला नावच मुळी 'हनिमून सिस्टायटीस' असे आहे. तिची युरिन बघितली तर पससेल्स खूप जास्त होत्या आणि पोटात दुखणे हे लक्षण मूत्रशयापर्यंत संसर्ग गेल्याचे दाखवत होते. आणखी एक प्रकार म्हणजे - पायलोनेफ्रायटीस म्हणजे किडनीचे इन्फेक्शन. हे बरेचदा स्टोनमुळे होते. पण मूत्राशयापासूनही होऊ शकते. हे मात्र खूप गंभीर असते. ह्यामुळे किडनी फेल होऊ शकते. त्यामुळे वेळीच उपचार घेणे चांगले.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन टाळण्यासाठी काय करावे?
- शौचानंतर आणि पाळीच्या वेळी स्वच्छता: ही अतिशय महत्त्वाची आहे. पॅड वेळोवेळी बदलणे, शौचानंतर गुदभागाला लागलेला हात मूत्रमार्गाला लागू न देणे. ह्यासाठी स्त्रियांना आपल्या गुप्त भागाची माहिती असणे गरजेचे आहे. हे लहानपणापासून शिकवले गेले पाहिजे.
- पाणी जास्त पिणे: ह्यामुळे जास्त युरिन तयार होऊन चुकून थोडे जंतू युरिनरी ट्रॅक्टमधे आले असतील तर निघून जातील. उन्हाळ्यात युरिन कमी तयार होते म्हणून इन्फेक्शन लगेच होते. म्हणूनच युरिन इन्फेक्शन ला ‘उन्हाळे लागणे’ असेही म्हणतात.
- मूत्र उत्सर्जनाचे वेग आल्यावर लगेच जाणे, शरीरसंबंधा आधी आणि नंतर लगेच मूत्र विसर्जन करणे आणि तो भाग पाण्याने धुवून साफ करणे.
- खूप घट्ट आणि नायलॉन किंवा सिंथेटिक अंतर्वस्त्रे न घालणे. कॉटनची अंतर्वस्त्रे घातल्याने मूत्रमार्गाजवळ ओलसरपणा साठून राहत नाही.
युरिन रिपोर्ट: ह्यामध्ये सकाळची पहिली युरिन लॅबमध्ये दिल्यास त्यात पस सेल्स आणि तांबड्या पेशी असल्या तर इन्फेक्शन असू शकते.
युरिन कल्चर: ह्यासाठी सुरुवातीचे आणि शेवटचे सोडून मधले (mid stream) युरिनचे सॅम्पल निर्जंतुक डबीत द्यावे लागते. ह्यामध्ये कोणत्या बॅक्टरीयाचे इन्फेक्शन आहे आणि त्यावर कोणती अँटी बायोटिक उपयुक्त आहेत ते समजते. साधारणपणे ह्या दोनच टेस्ट आवश्यक असतात.
पण जर औषधांनी बरे वाटत नसेल तर Cystoscopy, सोनोग्राफी किंवा CT स्कॅन सुद्धा करावा लागतो.
किडनी स्टोन असेल तर ह्यामुळे समजतो आणि मग तो काढला की इन्फेक्शन आपोआप बरे होते.
इन्फेक्शन वर दोनच उपचार असतात; एक तर पाणी जास्त पिणे आणि दुसरे म्हणजे अँटिबायोटिक्स.
खरंतर भरपूर पाणी पिणे हा सोपा उपाय आहे, असं वाटू शकतं. पण शहरातल्या स्त्रियांना घराबाहेर पडल्यावर सार्वजनिक मुताऱ्या फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात. शिवाय सार्वजनिक टॉयलेटची अवस्था वाईट असल्यानेही त्या लघविला जाण्याचे टाळतात आणि त्या कमीच पाणी पितात. घराबाहेर पडले की स्वच्छ शौचालय मिळत नाही म्हणून बऱ्याच स्त्रिया घरी येइपर्यंत मूत्रविसर्जन करत नाहीत. ह्यामुळे सुद्धा युरिन इन्फेक्शन होऊ शकते. आपल्या आतडयात असलेले बॅक्टेरिया मूत्रनलिकेतून मूत्राशयात जातात. जर ते वेळच्या वेळी रिकामे झाले नाही तर ते बॅक्टेरिया वाढून इन्फेक्शन होऊ शकते. ह्याच कारणाने मुतखडे, मूत्राशयाचे स्नायू दुर्बळ होणे वगैरे रोगही होतात.
मूत्रमार्गाच्या इन्फेक्शनची लक्षणे पाहून डॉक्टर कल्चर आणि सेनसिटीव्हीटी टेस्ट करायला सांगू शकतात. त्यानंतर जी उपयुक्त अँटिबायोटिक्स आहेत तीच लिहून देतात. पण त्यांनी सांगितलेला डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. जरा बरे वाटल्यावर औषधे सोडून दिल्यास जंतू पुन्हा पुन्हा वाढतात. अर्धवट उपचार सोडल्यास बॅक्टरीया त्या औषधांना रेझिस्टंट होतात त्यामुळे पुन्हा इन्फेक्शन झाल्यास आणखी महाग अँटीबायोटिक घ्यावी लागतात. स्त्रियांच्या शरीर रचनेमुळे स्त्रियांना मूत्रमार्गाचे इन्फेक्शन वारंवार होते. पहिल्यांदा होईल तेव्हाच नीटपणे उपचार घ्यावेत आणि नंतर ते टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. ह्यामुळे पुढची गुंतागुंत टळू शकते.
मूत्रमार्गाच्या इन्फेक्शनची लक्षणे पाहून डॉक्टर कल्चर आणि सेनसिटीव्हीटी टेस्ट करायला सांगू शकतात. त्यानंतर जी उपयुक्त अँटिबायोटिक्स आहेत तीच लिहून देतात. पण त्यांनी सांगितलेला डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. जरा बरे वाटल्यावर औषधे सोडून दिल्यास जंतू पुन्हा पुन्हा वाढतात. अर्धवट उपचार सोडल्यास बॅक्टरीया त्या औषधांना रेझिस्टंट होतात त्यामुळे पुन्हा इन्फेक्शन झाल्यास आणखी महाग अँटीबायोटिक घ्यावी लागतात. स्त्रियांच्या शरीर रचनेमुळे स्त्रियांना मूत्रमार्गाचे इन्फेक्शन वारंवार होते. पहिल्यांदा होईल तेव्हाच नीटपणे उपचार घ्यावेत आणि नंतर ते टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. ह्यामुळे पुढची गुंतागुंत टळू शकते.
धन्यवाद, उपयुक्त माहिती, सोप्या भाषेत सांगितली आहे.
ReplyDeleteVery informative... Thanks for sharing...
ReplyDeleteमुद्देसूद लिहले आहे,त्यामुळे स्वतःची नक्की कशी काळजी घ्यायची कळते.
ReplyDeleteVery good information & implementable. Except Sulabh Shouchalay. It is of utmost need for all.
ReplyDeleteउपयुक्त माहिती आहे.घरातल्या स्त्रीयांना,मुलिंना ही माहिती दिली गेली पाहिजे.पण ही दुखणी सहसा दुर्लक्षीत असतात. आणि अंगावर काढली जातात.
ReplyDeleteमहत्त्वाची माहिती.. शेअर करते
ReplyDeleteUseful information
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete