कमलादी भेट पहिली आणि शेवटची …

कमला भसीन यांचं नाव आणि त्यांच्या कामाबद्दल खूप ऐकून होते; कारण OBR ( One Billion Rising) ह्या कॅम्पेन च्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील समन्वयक म्हणून काम करीत होत्या. नाशिकमध्ये २०१७ साली OBR चं पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. आमची संगिनी महिला जागृती मंडळ ही संस्था मुख्य आयोजक होती. 2019 मध्ये माझी आई (साथी अनिताताई पगारे) नेपाळला संगत च्या कोर्सला गेली होती. संगत म्हणजे South Asian Network for Gender Activity and Training. तीस - पस्तीस वर्षापूर्वी कमलादी व त्यांच्या समविचारी मित्र मैत्रिणी एकत्र करून ' संगत ' नेटवर्क सुरू केले. आई या कोर्स जाऊन आल्यानंतर कमलादीबद्दल अजून माहिती झाली. त्यांच्या विषयी नेहमी ऐकायला मिळत असे. शेवटी डिसेंबर 2019 मध्ये मी त्यांना प्रत्यक्ष भेटू शकले.

मला आजही ती आमची भेट चांगलीच आठवते. नाशिकमध्ये मध्ये महाराष्ट्र महिला हिंसामुक्ती परिषद च आयोजन करण्यात येणार होते आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कमला भसीन येणार होत्या. कमलादीला भेटता येणार होतं, म्हणून माझा या परिषदेचं काम करण्याचा अजून उत्साह वाढला. आता दोन दिवस त्यांच्या सोबत राहता येणार होतं. त्यामुळे आम्ही जोमाने कामाला लागलो.

19 डिसेंबरला मी कमलादीला पहिल्यांदा प्रत्यक्ष बघत होते. त्यांना त्यांची रुम दाखवायला मी मनीषाताई गुप्ते आणि डॉ. रमेश आवस्थी सरांसोबत गेले. कमलादी गाडीतून उतरल्या आणि मी त्यांना म्हटलं, “आपका बॅग मुझे दिजीए ,मैं लेती हूं .” तर कमलादी उत्तरल्या.. “मैं तुझे क्या बुढ्ढी दिख रही हूं ?” शेवटी त्यांनी त्यांची बॅग नाहीच दिली. हा एक अनुभव कायम लक्षात राहण्या सारखा आहे.

सायंकाळी कमलादीच्या हस्ते परिषदेचं उदघाटन झालं. ताईंनी जोरदार त्यांच्या शैलीत भाषण केलं आणि नंतर छानपैकी सर्वांसोबत फोटोसेशन मध्ये रमल्या. त्या इतक्या रमल्या की मला मनीषा ताईना विनंती करावी लागली की कृपया कमला ताईंना जेवायला घेऊन जा नाही तर कोणी हॉल मधून बाहेर जाणार नाही. नंतर जी काही गाण्यांची मैफिल जमली तिचं तर शब्दांत वर्णन करू शकत नाही.

तुम्हारा साथ मिलने से, एहसास- ए- कुवत आया है,

नई दुनिया बनाने का जुनुन फिर हम पे छाया है ।

कुछ तनहा तनहा मैं थी, कुछ तनहाई तुम मैं थी

दोनों में थी लाचारी, दोनों थी थकेहारी

इजहारे राज करने से, घुटन को कुछ घटाया हैं।

तुम्हारा साथ मिलने से, एहसास-ए- कुवत आया है…

त्या गात होत्या आणि सगळेजण साथ देत होते. पूर्ण परिषदेत कमलादीमुळे जान भरली गेली होती.

थोडं नटखटपणाने भरलेलं व्यक्तिमत्त्व - भरभरून उत्साह, ऊर्जा, Beauty with Brain, Caring, Powerful ... कमलादी म्हणजे फक्त एक व्यक्ती नसून चालत बोलतं विद्यापीठ होत्या.

माझ्या आयुष्यातील मला खुप आवडणाऱ्या त्रिदेवी आहेत. मला हे जग दाखवणारी माझी आई अनिता पगारे, जेष्ठ स्त्रीवादी नेत्या मनिषाताई गुप्ते आणि दि ग्रेट कमलादी भसीन. या त्रिदेवी कडून अनेक गोष्टी शिकले आणि शिकत राहील.

2021 मधले दोन दिवस किंवा दोन सकाळ मी कधीच विसरू शकत नाही. एक तर 28 मार्च 2021 ज्या दिवशी माझी आई - हे जग सोडून गेली. आणि दुसरा दिवस 25 सप्टेंबर 2021 ज्या दिवशी कमलादी आपल्या सर्वांना अलविदा म्हटल्या. माझ्या आईमुळे व मनिषा मावशी मुळे कमलादी भसीन सारख्या ग्रेट व्यक्तीला भेटता व अनुभवता आले.

कमलादीच्या कार्याला सतरंगी सलाम आणि त्यांचं कार्य मी माझ्या कामातून पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करीत राहीन!



कल्याणी अनिता मनोहर


 

आमचं सिंबायोसिस

कामानिमित्त बाहेर गेलेला नवरा कधी बाहेरून फोन करतो, चहा टाक ना, येईन मी दहा मिनिटांत. कंटाळा आला असला तरी मी चहा टाकते. मुलगा म्हणतो, ‘आज काहीतरी टेस्टी कर ना,’ त्या वेळी त्याच्या आवडीचे काही तरी करते मी. मुलीच्या आणि माझ्या आवडीनिवडी ब-याच सारख्या. ‘उद्या जेवायला भगर आमटी करीन, अभ्यास कर’. म्हटलं की हातातलं काम पटापट संपवते. हे सगळं सांगायचा मुद्दा असा की आमच्या घरातले रांधावाढाउष्टीकाढा डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, आणि ते मी स्वतःहून स्वतःकडे ओढून घेतले आहे. हा निर्णय मी मुद्दामून घेतला नाही. पण मला नेहमीच लग्न करायचे होते, आणि मला नेहमीच दोन मुलं हवी होती. या दोन्ही गोष्टी किती ओव्हरहाईप्ड आहेत याची जाणीव पुढे कधी तरी झाली; पण तरीही मला हे सगळे हवेच आहे! लग्न केलं म्हणजे रांवाउका डिपार्टमेंट हातात आलेच पाहिजे असे नाही. मी जेंव्हा घरी राहायचे ठरवले, तेंव्हा रांवाउका हातात आले आणि तीन मिनिटांत मला जाणीव झाली की आपण फारच बेकार हाऊस मॅनेजर आहोत. रोज स्वयंपाक केला पाहिजे या तत्वावर आपला विश्वास नाही आणि घराच्या आरोग्यासाठी हे योग्य नाही. मग माझ्या मदतीला या विषयातले तज्ज्ञ आले. माझ्या घरी भांडी घासायला, स्वयंपाक करायला इतकेच काय मुलं सांभाळायला मदतनीस आल्या. मी उघडपणे मदत स्वीकारते आणि माझे आयुष्य सुरळीत सुरू आहे. माझ्या मदतनीस ह्या मदतनीस कमी आणि माझी लाईफलाईन जास्त आहेत हे वास्तव आहे. वर सांगितलेली कामं मी घरात राहणा-या व्यक्तीमध्ये झालेल्या कामाच्या विभागणीचा भाग म्हणून करते. 
मुलगा गॅसपुढे उभा राहण्याच्या वयाचा झाल्यापासून ब-याचवेळा स्वतःसाठी काहीबाही खाणे बनवतो. मुलगी अजून काही वर्षे गॅस सुरू करु शकणार नाही. पण फ्रीजमधले पातेले काढून कपात दूध ओतून पिते, ब-याचदा सांडते, मी लक्ष देत नाही कारण तिला कपात दूध ओतून देणे माझे काम नाही, तिचे स्वतःचे आहे असे माझे मत आहे. शाळेने घरी असलेल्या आयांनी मुलीचे सहशिक्षक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्यावर मी तिला शालेय अभ्यासक्रम शिकवण्यासाठी दिवस खर्च करणे माझे काम नाही, याच ठसक्यात मी सांगितले आहे. तिची शाळा ते करेल लागली मदत तर मी आहेच. गृह व्यवस्थापक म्हणून काम करत असले तरी मी हॅंड्सऑन आई किंवा बायको नाही. मी आधी मी आहे; त्याच्यानंतर मी बाई, बायको, आई आहे.
माझा स्वभाव खूप माझ्या आईसारखा आहे. आईने इतक्या लोकांना जेऊ घातले आहे की, तिच्याशी निगडीत लोकांच्या आठवणी बहुदा तिने त्यांना काय करुन खाऊ घातले अशा असतात. आजही तिचा तोच स्वभाव आहे. पण हा स्वभाव तिने जपला आणि त्यातून स्वयंपाकाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळेल याची व्यवस्था केली. नोकरीदार आणि घरी राहणा-या महिलांना घरातल्या स्वयंपाकाच्या राड्यात अडकून राहू लागू नये म्हणून पोळीभाजी केंद्र सुरू केले. तिने घर सांभाळले पाहिजे आणि काम करु नये अशा अर्थाच्या चर्चाही घरी कधी झाल्या नाहीत इतके आमचे व्यक्तीस्वातंत्र्य घरी प्रिय होते आणि आहे. 
तिच्यामाझ्या जोडीदारांतही ब-याच बाबतीत समानता आहे, दोघेही अतिशय किचकट शिस्तप्रिय आहेत. कामांची अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशातून दिवसाची आखणी करतात. पण त्या दोघांमध्ये आणि आम्हा दोघींमध्ये काही फरक आहेत. बाबांनी आईची साथ गृहित धरली. मी माझ्या जोडीदाराची साथ गृहित धरते. म्हणजे आणिबाणीच्या काळात सभेसाठी आलेले सत्तर लोक ऐनवेळेस घरी जेवायला आले तरी आई पिठलंभात करुन जेवायला घालेल ही खात्री बाबांना होती. माझा जोडीदार मला न सांगता चार लोकांनाही घरी जेवायला बोलावणार नाही याची खात्री आहे मला. 
रांवाउका मधला ‘रांधा’ हा प्रकार थोड्याफार प्रमाणात सोडला तर बाकी काहीच मला करावे लागत नाही याचे एकमेव कारण म्हणजे मी अशा आर्थिक वर्गात मोडते, जो वर्ग संपन्न आणि सुजग आहे. (संपन्नता असली तरी समानता असेल असे नाही.) मध्यमवर्गीय संपन्नता नसती आणि मी नोकरी सोडली असती त्या क्षणी मला घरकामात पूर्णपणे गुंतवून घ्यावे लागले असते. आज मध्यमवर्गासाठी काम करणारे मदतनीस त्यांच्या आयुष्यातले घरकामही सांभाळत आहेत. या सगळ्या मदतनिसांची मुलं शिकून मोठी होत आहेत. उद्याचे चित्र वेगळे असेल. परदेशी राहणा-या भारतियांप्रमाणे घरकाम सगळ्यांना करावे लागेल. सध्या माझे स्वातंत्र्य माझ्या गृहमदतनीसांच्या सहाय्याने अबाधित आहे. म्हणजे त्या नसत्या तर मला विचार करण्याची शक्ती, किंवा स्वतंत्र अस्तित्व नसेल अशातली गोष्ट नाही. मध्यंतरी त्या नव्हत्या तेंव्हा आम्ही घरातल्यांनी सगळी कामे वाटून घेऊन केलीच. पण आज त्या आहेत म्हणून माझ्यावरच्या जबाबदा-या वाटल्या जात आहेत. विशेषतः जी मदतनीस माझ्या मुलीला सांभाळायला मदत करते तिचा मला खूप आधार आहे.
माझे आजी आजोबा, आई बाबा आणि नंतर माझा जोडीदार एकाच प्रकारच्या विचारप्रवाहाचा भाग आहेत म्हणून मला संघर्ष करावा लागला नाही. हे माझे नशीब नाही तर माझे प्रिव्हिलेज्ड मध्यमवर्गीय आयुष्य आहे. मला स्त्री म्हणून जन्माला आल्यापासून आजपर्यंत काही संघर्ष करावे लागले, कधी कधी नोकरीत दुजाभाव सहन करावा लागला. पण स्वयंपाकघराची जबाबदारी घेण्याची सक्ती माझ्यावर कधी झाली नाही. कधी परंपरेच्या चौकटीत राहून स्त्री म्हणून कमीपणा भोगावा लागला नाही, पाळी सुरू आहे म्हणून हिडीसफिडिस वागणूक सहन करावी लागली नाही, आपल्याकडे अशी पध्दत आहे म्हणून अमुकतमूक गोष्ट पाळ अशी सक्ती झाली नाही. हे स्वातंत्र्य, हे प्रिविलेज माझ्या मदतनीसांना लाभले नाही. त्यांना माझ्याकडे रांधावे लागते. आणि शिवाय त्यांच्या स्वतःच्या घरी जाऊन रांधा, वाढा, उष्टी काढा हे सगळे करावे लागते. इतकेच नाही तर त्या ज्या परिस्थितीत राहतात त्यात त्यांना अनेक प्रकारचा अन्याय आणि हिंसाचार सहन करावा लागतो. त्यांच्या समस्या माझ्या आहेत असे मी म्हणणार नाही, पण त्यांच्या समस्यांना सोडवण्यासाठी मदत करणे माझे कर्तव्य आहे असे मी मानते. या समस्या कमी झाल्या आणि त्यांच्याही  आयुष्यात माझ्या आयुष्यातल्या काही चांगल्या गोष्टी आल्या तर त्यांचा विकास होईल याची मला जाणीव आहे. आणि माझ्या आजूबाजूलाच असलेल्या स्त्रियांच्या विकासासाठी काही ना काही प्रमाणात सहभागी व्हायची माझी सतत तयारी असते. हा सहभाग नेहमी फक्त आर्थिक नसतो. त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगणे, त्यांच्या अंधश्रध्दा दूर करणे, शिक्षणाचे महत्व सांगणे, त्यांच्या अडचणी एक मैत्रीण म्हणून ऐकून घेणे अशा मार्गाने सुध्दा हा सहभाग साधता येतो. माझ्या आयुष्यातल्या या महिलांच्या मागचे रांधावाढाउष्टीकाढा संपले तर माझ्या विकासाचे चक्र पूर्ण होईल!

भक्ती चपळगावकर

महाराष्ट्रातल्या स्त्री हिंसेच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पुरोगामी संघटनांची भूमिका

जेव्हा हिवाळी अधिवेशनात ‘शक्ती कायदा’ मांडला गेला होता तेव्हा देखील अनेक महिला कार्यकर्त्यांनी या कायद्याला विरोध केला होता. त्यानंतर ते ‘शक्ती विधेयक’ महाराष्ट्र विधी मंडळाच्या संयुक्त निवडसमितीकडे विचार विनिमयासाठी पाठवले गेले होते. या पार्श्वभूमीवर अत्याचारग्रस्त स्त्रियांना खरा न्याय मिळावा सध्या स्त्रियांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी अनेक कायदे आहेत त्यांची चोख आणि संवेदनशील अंमलबजावणी केली जायला हवी आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाव्यात असे या कार्यकर्त्यांना वाटते. म्हणून ‘स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती’ च्या माध्यमातून काही सूचना मांडणारे एक निवेदन प्रसारित केले आहे.  

स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती
महाराष्ट्रातील पुरोगामी धर्मनिरपेक्ष
स्त्री संघटना-गट-कार्यकर्त्यांचा संयुक्त मंच

मुंबई, पुणे, उल्हासनगर, वसई... परत एकदा लहान मुली, स्त्रिया यांच्यावर भीषण, क्रूर प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यावर काही उपाय आहेत की स्त्री संघटनांनी व कार्यकर्त्यांनी रोज फक्त निषेध आणि त्याच त्याच मागण्या करत राहायच्या? नेहमीप्रमाणे समाजातून वेगवेगळे आणि तितकेच हिंसक सूर उमटत आहेत – आरोपींना फाशी द्या, त्यांचे लिंग विच्छेदन करा, त्यांचा एनकाउंटर करा किंवा मग स्त्रियांनी सातच्या आत घरात यावे, स्वतःचे शरीर झाकणारे कपडे घालावेत, मोबाईल वापरू नये, चायनीज खाऊ नये, पुरुषांशी बोलू नये असे (स्त्रियांनाच हिंसेला जबाबदार ठरवणारे) सनातनी सल्ले! काही महाभाग तर बलात्कार करणार्‍याबरोबर लग्न करण्याचा सुद्धा सल्ला देतात!

या ताज्याघटना घडल्यानंतरलगेचच कडक कायदाआणण्याचीघोषणामा. गृहमंत्र्यांनीकेली आणि विरोधीपक्षनेत्यांनीबलात्कारालाफाशीचीशिक्षादेण्याचीमागणीकेली! राष्ट्रीयमहिलाआयोगहीधावूनआले. खरेतरसध्याआपल्याकडेस्त्रियांवरहोणार्या विविधप्रकारच्याहिंसेलाआळाघालण्यासाठीअनेककायदेआहेत – बलात्कारविरोधीकलमांत२०१३मध्येकेलेल्यासुधारणा(ज्यात बलात्कारालाफाशीदेण्याचीतरतूदकरूनठेवलीआहे!), पॉक्सो, कामाच्याठिकाणीलैंगिकछळप्रतिबंधककायदा, ४९८ कलम, कौटुंबिकहिंसाचारविरोधीकायदा, एट्रॉसिटीकायदा, सायबरएक्ट, अल्पवयीनलग्नरोखण्यासाठीकायदा, हुंडाप्रतिबंधककायदा, लिंग निदानविरोधीकायदा इत्यादी. परंतुखराप्रश्नआहेत्यांच्या चोख आणि संवेदनशील अंमलबजावणीचा, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आणि ते करण्यासाठी आर्थिक तरतूद करून पैसे खर्च करण्याचा!

मा. मुख्यमंत्र्यांनी१५दिवसातआरोपपत्रदाखलकरूनमहिन्यातनिकाललावण्याचेआदेशपोलीसअधिकार्यांना दिलेआहेत. परंतुझट कीपटन्याययापेक्षाव्यवस्थिततपासकरूनसर्वपुरावेगोळाकरणारेप्रशिक्षितआणिसंवेदनशीलपोलीस – प्रशासन – न्यायव्यवस्थाउभीकेलीआणित्यासाठीदरवर्षीअर्थसंकल्पातपुरेशीतरतूदकेलीतरचजास्तीतजास्त  अत्याचारग्रस्त स्त्रियांना खरा न्याय मिळेल असेआमचेस्पष्टमतआहे! एवढेचनाहीतरहिंसाचाररोखण्यासाठीवर्मासमितीच्याशिफारसीअंमलातआणल्यातरअधिकउपयुक्तठरेल. दोनवर्षेसत्तेवरअसलेल्यामहाआघाडीसरकारनेअशीठोसपावलेउचलावीतअशीआमचीअपेक्षाहोती, परंतुतीफोलठरलीआहेअसेखेदानेआम्हीनमूदकरीतआहोत. समुपदेशक, फास्टट्रॅककोर्ट, प्रशिक्षणकार्यक्रम, वन स्टॉपसेंटर, पीडितमहिलांसाठीवसतिगृह, संरक्षणअधिकारी, स्थानिकसमित्या.. सर्वत्रसुविधांचाअभाव आणि नोकरशाहीवृत्तीमुळेप्रचंडविलंब दिसतो आणि सुविधाअसलीचतरीपीडितेबाबतसंवेदनशीलतेचाअभावदिसतो! शिवायन्यायालयीनप्रक्रियाप्रचंडवेळखाऊआहे. बलात्कारालाफाशीचीशिक्षादिल्यानेगुन्हेगारांनाशिक्षाहोण्याचेप्रमाणवाढतनाही, हेआकडेवारीतूनसिद्धहोते! किंबहुनाशिक्षाजितकीकडकतितकीतीहोण्याचेप्रमाणकमीहेचआजवरदिसलेआहे. अगदीवर्माकमिटीनेहीमृत्युदंडानेबलात्काराच्यागुन्ह्यांनाआळाबसतनाहीअसेचम्हटलेआहे. त्यामुळे अस्तित्वातअसलेलेकायदेअधिकप्रभावीपणेअंमलातआणलेतरआरोपींनाशिक्षाहोण्याचीअधिकखात्रीअसेल. त्यामुळेकायद्याचाधाकवाढूनस्त्रियाआणिबालकांच्याविरोधातलीहिंसाकमीहोण्याचीशक्यतावाढेल.  

गेली अनेक वर्षेदेशातराबवलेल्याआर्थिकधोरणांमुळेवाढतजाणारीगरिबी, बेरोजगारीआणिसामाजिकअस्थैर्य, यांतूनस्त्रियांचेजीवनअधिकाधिकअनिश्चितआणिअसुरक्षितहोतचाललेआहे; कोविडनेत्यातभरटाकलीआहे. अशास्थितीतस्त्रियांच्याअत्याचाराच्याप्रश्नांकडेसर्वांगीणपद्धतीनेपाहूनसरकारनेबहुआयामीपावलेउचलायलाहवीत. परंतुमहाराष्ट्रातस्त्रियांसाठीविशेषरोजगारनिर्मितीआणिविकासासाठीकार्यक्रम, महिलाआयोगाचीनेमणूक, महिलाधोरणाचीअंमलबजावणी, सार्वजनिकठिकाणांचेसेफ्टीऑडीट, प्रशासकीयपोलीससुधारणा, शैक्षणिकअभ्यासक्रमातबदल अशा अनेक महत्वाच्यापैलूंकडेसरकारनेअक्षम्यदुर्लक्षकेल्याचेआम्हालादिसते. 

पण योग्यधोरणेआणिकायदेराबवूनस्त्रियांवरीलगुन्हेरोखण्याचीजबाबदारीजशीशासनाचीआहे तशीच समाजाकडूनपणआमच्याकाहीअपेक्षाआहेत. आपल्याभारतीयसमाजातल्याविषमतेवरआधारितवर्ग-जात-पितृसत्ताकव्यवस्थेमुळेनिर्माणझालेलेस्त्रीचेदुय्यमस्थानकायमठेवण्यासाठीविविधप्रकारचेनियंत्रणआणिहिंसेचावापरसततकेलागेलाआहे. हुंड्याचीमागणी, लिंग निदान, जात-धर्माच्याबाहेरलग्नकरण्यावरनिर्बंध, एकूणचस्त्रीच्यानिवडस्वातंत्र्याचाअभाव हे त्याचेकाहीपैलूआहेत. त्याच्याजोडीलासद्यआर्थिक-सामाजिकपरिस्थितीतघरातआणिघराबाहेरस्त्रियाकरतअसलेल्याश्रमांचेसातत्यानेहोणारेअवमूल्यन, वाढत जाणाराभणंगपणा, बाजारीकरणाचाप्रभाव, माध्यमांकडूनस्त्रियांचेहोणारेवस्तूकरण यामुळेस्त्रियांप्रतिहिंसाहीकेवळभारतातचनव्हेतरजगभरातवाढतचाललीआहे.  

याची नोंद घेऊन, आम्हीस्त्रियांवरीलहिंसासहनचकरणारनाही!” (WE WILL NOT TOLERATE VIOLENCE AGAINST WOMEN!) असे प्रत्येकसमाजघटकाने ठणकावूनसांगायलाहवेअसेआमचेस्पष्टमतआहे आणि असे वातावरणनिर्माणकरण्यासाठीकृतीकरायलाहवी. जिथेअत्याचारघडतोतिथेपीडितेच्याबाजूनेउभेराहूनतिलाआपापल्यास्तरावरसर्वप्रकारचीमदतकरावी. केवळबलात्काराबाबतबोलूनचालणारनाहीतरकौटुंबिकहिंसा, कामाच्याठिकाणीलैंगिकछळ, जात आणि धर्माच्यानावाने, अस्मितेचेनावपुढेकरूनकेलेलीहिंसा, राजकीयहेतूनेप्रेरितहिंसा, सर्व प्रकारचाभेदभावयासगळ्यालामूठमातीदेण्यासाठीएकमोठ्यासामाजिकप्रतिबंधात्मकमोहिमेचीगरजआहे. भारतीयराज्यघटनेनेस्त्रियांनासन्मानपूर्वकजगण्याचाअधिकारदेऊन जे हक्क बहालकेलेआहेत, त्यांचाआधारघेऊनसमतेवरआधारितसमाजनिर्मितीसाठीसर्वांनीहातभारलावलातरचहीहिंसाथांबणारआहे. सर्वलोकशाहीप्रेमीआणिधर्मनिरपेक्षनागरिक, राजकीयपक्ष, ट्रेडयुनियन, स्वयंसेवीसंस्थाआणिमहिलांच्याउन्नतीसाठीकामकरणाऱ्या तमाम गटांनीएकत्रयेऊनहीभूमिकापुढेघेऊनजावेअसेआमचेआवाहनआहे.

आमच्या प्रमुख मागण्या 

  • महाआघाडी सरकारने वरवरच्या तरतुदी असलेलेशक्ती विधेयकमागे घ्यावे. सर्व अस्तित्वात असलेल्या कायद्यांची कठोर अंमलबजावणी करावीत्यासाठी तपास यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि न्यायालयांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक खर्चासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करावी. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (सध्या फक्त १९%) वाढवण्यासाठी कसून प्रयत्न करावेत.
  • न्यायाधीश वर्मा समितीच्या शिफारशीनुसार राज्यात प्रशासन, पोलीस आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी पावले उचलावीत.
  • प्रशासन, पोलिस आणि न्यायव्यवस्था यांचे सर्व स्तरांवर लिंगभाव संवेदनशील दृष्टिकोनातून प्रशिक्षण तातडीने करण्यात यावे, त्यामध्ये स्त्री-बालक हक्कांसाठी काम करणाऱ्या, परिवर्तनवादी चळवळीतल्या संस्था संघटनांना सामील करावे.
  • महिला वा बालक यांच्यासाठी असलेल्या सर्व कायदे, कार्यक्रम आणि सुविधांचे (उदा. विविध हेल्पलाईन, महिला कक्ष, विशेष पथके, देखरेख समित्या इत्यादी) सोशल ऑडिट करावे. यात विशेषतः गृह, न्याय, सामाजिक न्याय, शिक्षण, विधी विभाग, आरोग्य या विभागांचा समावेश असावा. तसेच सार्वजनिक आणि महिलांचा अधिक वावर असलेल्या ठिकाणांचा सुरक्षा लेखाजोखा (सेफ्टी ऑडीट) करून  त्याच्या आधारावर कृती कार्यक्रम आखावा. 
  • शालेय उच्च शिक्षणात लिंगभाव संवेदनशील अभ्यासक्रम तयार करून समाविष्ट करावा.   राज्य महिला आयोगावर पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या सक्रीय कार्यकर्त्यांची नेमणूक करावी.
  • पूर्वीच्या महिला धोरणांचा आढावा घेऊन अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा.
  • मनोधैर्य तसेच एट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडितांना मदत मिळवताना येणाऱ्या अडचणी त्वरित दूर कराव्यात
  • पीडितांना महिलांना त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे तसेच समुपदेशन, वैद्यकीय उपचार, पुनर्वसन यासाठी दीर्घकाळ साहाय्य केले जावे
  • बेघर, तसेच भटके-विमुक्त आणि स्थलांतरित नागरिक आणि विशेष करून त्यांच्यातील महिला मुलांसाठी रात्र निवारागृहांची (नाईट शेल्टर) सोय करावी.
  • आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाहितांना संरक्षण देणारा तसेच तथाकथित प्रतिष्ठेपायी घडणारे गुन्हे (ऑनर क्राईम) विरोधी कायदा करावा.