Emma


ही एक फ्रेंच व्यंगचित्रकार आहे. ती कम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून काम करते. तिने स्त्रीवाद, पर्यावरण, आर्थिक घडामोडी अशा अनेक विषयांवर व्यंगचित्र काढली आहेत. महिलांवरचे मानसिक ओझे हा तिचा आवडता विषय आहे. पुरुषांच्या घरकामातील सहभागावर टीका करणाऱ्या ‘You should have Asked’ ह्या मालिकेने फ्रांस मध्ये खळबळ माजवलेली होती. लवकरच तिचे Mental Load हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.






# MeToo

जेव्हा #MeToo मोहीमेने जोर धरला होता – तेव्हा त्याविरुद्ध बऱ्याच पुरुषांकडून अविश्वास व्यक्त केला जात होता. ह्या मोहिमेची खिल्ली उडवण्यासाठी अनेक विनोद आणि व्यंगचित्रे सोशल मिडियातून प्रसारित केली जात होती. त्यांना जगभरातल्या अनेक महिलानी व्यंगचित्रांच्याच माध्यमातून उत्तर दिले. त्यापैकी ही काही व्यंगचित्रे









तनिका गोडबोले

तनिका एक तरुण पत्रकार आणि लेखिका आहे. Feminism In India च्या वेबसाइट वर तिचे अनेक लेख प्रकाशित होत असतात. त्याशिवाय ती महिलांचे आणि LGBT समाजाचे मानवी हक्क आणि प्रसारमाध्यमे या विषयांशी संबंधित व्यंगचित्रे काढते. ‘शादी कर लो सब ठीक हो जाएगा’ ही तिची गाजलेली व्यंगचित्र मालिका आहे. तिच्या रोजच्या आयुष्यातल्या अनुभवांव्यतिरिक्त पुस्तके,सिनेमा आणि टीव्ही मालिका हे तिच्या चित्रांचे विषय असतात. उपहासाचा उपयोग करून तिच्या व्यंगचित्रातून ती लोकांना हसवण्या सोबत विचार करायला लावते. तिने काढलेली काही व्यंगचित्रे इथे देत आहे.  एका चित्रात बस किंवा ट्रेनमध्ये पुरुषांच्या पाय पसरून बसण्यामुळे जसा त्रास होतो ; तसा विमान प्रवासात महिलांशी लगट करण्याने होणारा त्रास तिने रेखाटला आहे.  तर एका  व्यंगचित्रात योनिशुचितेला एक निराळ्याच पद्धतीने बगल दिली आहे . महिलांच्या लैंगिकतेवर समाजाची दुटप्पी भूमिका दाखवणारी काही चित्रे आहेत.  Missfit Comics ह्या तिच्या फेसबुक पेजवर आणि Istagram वर तिची इतर अनेक व्यंगचित्र पहाता येतील.